परिवर्तन समूह बहुउद्देशिय संस्थेमार्फत व HDFC बँकेच्या पुढाकाराने मोफत दहा हजार फळ रोपांचे वाटप

मेट्रो सोलापूर –

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या कुटुंबीयांची पोषण मूल्य वाढविणे, सोलापूर जिल्हा व परिसरातील तापमान कमी करणे साठी वृक्षारोपण करून परिसरातील समूह संस्था शेतकर्‍यांना मोफत फळ रोपांची वाटप ही गेली दोन वर्षे सातत्याने करत असल्याचे परिवर्तन समूहाच्या सचिवा अमृता अकलूजकर यांनी मोफत रोपे वाटप कार्यक्रमांत सांगितले.

यावर्षी तिर्हे, बेलाटी आणि शिवणी या तीन गावांमधून 200 हून अधिक शेतकर्‍यांना, परिवर्तन समूह संस्थेच्या वतीने 10000 मोफत फळं रोपे वाटप करण्यात आले परिवर्तन समूह संस्था ही वाटप केलेल्या झाडांची दिल्यापासून सातत्याने जातीने निरीक्षणे करते, यामुळे शेतकर्‍यांना रोपे वाढविताना आलेल्या अडचणी सोडविण्यास मदत होते तसेच रोपांची वाढ व्यवस्थित कशी करता येते आदी विषयी योग्य मार्गदर्शन दिले जाते.

ग्रामीण समुदायांमध्ये आर्थिक वाढ, पोषण आणि पर्यावरणीय स्थिरता वाढवणे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाचे पालन-पोषण कल्याण आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत रोपे वितरित करण्यासाठी एक प्रमुख कार्यक्रम सुरू केले आहे.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश

– मूल्यवर्धित विक्रीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
– ताजी फळे प्रदान करून पोषण सुरक्षा सुधारणे
– वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन आणि हिरवे आच्छादन वाढवून हवामानातील नकारात्मक बदल कमी करणे.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर , खजिनदार जगदीश बिडकर, एचडीएफसी बँकेचे सर्कल हेड मनिष वारके,विनायक कुलकर्णी क्लस्टर हेड तसेच कर्मचारीवृंद मनिष काटे, राजरत्न लामतुरे, शिवणी गावचे कृष्णा गुंड आदीसह इतर स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *