पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा जागरासह झाला सन्मान सोहळा

श्रावणधारांच्या सोबतीने “गणेशयुगचे” रंगतदार आगमन

मेट्रो सोलापूर –
श्रावणधारांच्या मधुर नादात सोलापूरात शनिवारी १७ ऑगस्ट रोजी गणेशयुगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या संगतीने गणेशयुग प्रदर्शन,विक्रीचे उद्घाटन तसेच कॅलेंडरचे प्रकाशन अक्कलकोटचे व्यावसायिक सिद्धेश्वर नागनाथ मोरे यांच्या शुभहस्ते
उत्साही वातावरणात पार पडले

उद्घाटन सोहळ्यात मंचावर सौ.असावरी गांधी,विकास गोसावी,डॉ.अंशू शर्मा,तनिष्क गोसावी, रेश्मा गोसावी, विकास कस्तुरे,आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रचार करण्यासाठी सहाय्यक ठरलेल्या कु. ईरा वळसंगकर, कु.रायना मनचंदा, डॉ.वैष्णवी जंगम, कु.रुही कोठाडिया, कु. शनाया किनगी, कु.कौशिकी कोठे, कु.अनोखी व्होरा, कु.समृद्धि थोबडे, कु.आराध्या गांधी, कु.सुमेध ताटी, कु.रिद्धी पबनानी, कु.अयांश पबनानी, आणि कु.कुश पबनानी या बालकलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय, सौ. निराली पटेल (मेकअप आर्टिस्ट), आनंद चव्हाण (फोटोग्राफर), धनराज घोडके,अमोल मोहिते, ऋतुजा दुसे, प्रसाद लिमये, प्रभू राठोड,संकेत थोबडे, प्रदीप पमनानी,गिरीश पमनानी, डॉ.कादे, डॉ.लोखंडे, दीपक शिराळकर, संतोष पाठक, राजेश दैवज्ञ, धीरज पिसे, डॉ.कोलूर,भावेश शहा, वसंत गावडे, डॉ.मोनिका उमरदंड, विजय जाधव या मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या निवेदिका भूमिषा शाह यांनी उत्स्फूर्ततेने केले, तर आभार प्रदर्शन सोनाली वाघमोडे यांनी केले या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत असणार आहे

श्री गणेशउत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून, निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन गणेशयुगने यावेळी सर्व गणेशभक्तांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *