प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना दिला सतर्कतेचा इशारा…

 

           उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल 

मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत ७९% पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच दि. ४ रविवारी रोजी पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्ह्यासाठी ” रेड अलर्टचा ” इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. दौंड येथील सरीता मापन केंद्र या ठिकाणावरून पाण्याची आवक सद्यस्थितीत ७२००० क्यूसेक्स एवढी आहे व त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने उजनी धरणाचे पूर नियंत्रण करण्याकरिता आवश्यकतेनुसार सुरूवातीला कालवा, सीना माढा जोड कालवा (बोगदा), सिना माढा उपसा सिंचन योजना व दहीगांव उपसा सिंचन योजना मधून पुरनियंत्रणासठी विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व उध्वं भागांमधील धरणांमधून सोडलेला विसर्ग व येणाऱ्या पाण्याची ‘आवक’ लक्षात घेता पुरनियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार उजनी धरण सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये केव्हाही विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.  

 

शासन आदेशान्वये भिमानदी काठांवरील गावांना व नागरिकांना शासन स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता,उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर तसेच पुणे व सोलापूर या संयुक्त जिल्ह्याचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधिक्षक (ग्रामीण) यांना पूरस्थितीजन्य परिस्थितीबाबत उपाययोजनेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *