एक राखी वीर जवानांसाठी,वीरतपस्वी प्रशालेत अनोखा उपक्रम संपन्न

‘रक्षाबंधन म्हणजे ऋणानुबंध जपणारा सण’- ढाले सर

मेट्रो सोलापूर – 

सोलापुरातील बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशाला व कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोंदार्डे सर, अधिव्याख्यात्या सौ.गीता मासाळ मॅडम,भोसले मॅडम उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून बहिण-भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन विषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.बोंदार्डे म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी त्याग, बलिदान, समर्पण आणि सर्वस्व अर्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या लष्करी जवानास प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वतः राखी तयार करून एक वेगळा ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना ढाले सर म्हणाले,सीमेवर लढणारे वीर सैनिक आपले प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात या भावांच्या हातात बळ येण्यासाठी ‘एक राखी वीर जवानासाठी’ हा अनोखा उपक्रम प्रशालेने पहिल्यांदा राबविला आहे या वर्षी शाळेतील विद्यार्थिनींना वीर जवानांसाठी स्वतःच्या हाताने राखी बनवून पाठविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने हा अनोखा उपक्रम प्रशालेतील विद्यार्थिनींनी पूर्ण केला या राखीमुळेच देशाच्या सीमेवरील भावांचे नक्कीच रक्षण होईल.

याप्रसंगी अधिव्याख्यात्या सौ.गीता मासाळ मॅडम,भोसले मॅडम यांनी शाळेने हा नवोपक्रम, प्रेरणादायी व स्तुत्य असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. 

या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर यांंचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *