सहशिक्षीका रसिका बंदीछोडे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ति पुरस्कार…

सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम पुरस्कार

सोलापूर √ महिला दिनाचे औचित्य साधून सर फाउंडेशन व वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे ता.उत्तर सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या रसिका मधुकर बंदीछोडे यांना सोलापूर जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसिजन फौंडेशन च्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा , पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले,दैनिक सकाळचे संपादक अभय दिवाणजी, प्राचार्या डॉ. समीना नदाफ हे उपस्थित होते. सर फाउंडेशन चे राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे , राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे, जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण ,महिला समन्वयक अनघा जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालय येथील किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. श्रीमती रसिका बंदीछोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर अनेक उपक्रम घेतले आहेत. इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करणे, कार्यानुभव साहित्य निर्मिती, विशेष वाचन उपक्रम, विद्यार्थी मित्र व अभ्यास मित्र, पर्यावरण रक्षण व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण साठी इंग्रजी व गणित विशेष तयारी त्यांनी घेतली आहे. ‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या अभियानामध्ये भरीव असे योगदान दिले असून या शाळेचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे अशा उपक्रमशील शिक्षिका बंदीछोडे मॅडम यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. त्यांचा शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी त्यांचा सत्कार केला या यशाबद्दल केंद्रप्रमुख हरगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी बापुराव जमादार व गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबरगी यांनी श्रीमती बंदीछोडे यांचे अभिनंदन केले.

2 thoughts on “सहशिक्षीका रसिका बंदीछोडे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ति पुरस्कार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *