शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ०६ ऑगस्टला शैक्षणिक मोर्चाचे आयोजन…

मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक आणि शिक्षक इतर महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील  संघटनांच्या वतीने ६ ऑगस्टला विविध संघटनांकडून १५ प्रमुख प्रश्नांसाठी हा शैक्षणिक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसमोरील प्रश्न व समस्या शासन दरबारी मान्य झाल्याशिवाय शाळेतील प्रशासन सुकर होणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी लोकशाही मागनि आंदोलन केल्याशिवाय शासन दरबारी प्रश्न सुटणार नसल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या दिनांक १९ जुलै २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी एकाच वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले .

सोलापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनाना एकत्रित करून सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केले असुन या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने मंगळवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता चार हुतात्मा चौकातुन मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक व पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक मोर्चात सहभागी होणार आहेत .
या पत्रकार परिषदेस समन्वयक तानाजी माने, सातलिंग शटगार, मोहन पाटील मुश्ताक शेतसंदि, अण्णासाहेब भालशंकर, श्रीधर उन्हाळे, गुरुनाथ वांगीकर, नवनाथ पाटोळे, अंबादास चाबुकस्वार, रविशंकर कुंभार, रांगसिद्ध धसाडे, श्रावण बिराजदार, शोहेब खान, मारुती तोडकर, बापू निळ आदी उपस्थित होते.

⏹️ ⏹️ ⏹️ ⏹️ ⏹️

६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेऊन मोर्चा काढल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी शाळा पुर्ण वेळ भरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *