जि.प.शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारेनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद…

सोलापूर √ बाळे अंबिका नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांनी भेट दिली त्यांची ही भेट प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणुन पदभार स्वीकारले नंतर त्यांची पहिली भेट होती. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारत संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना सुस्वरूप उत्तरे दिली विद्यार्थीही त्यांना प्रश्न विचारले. शाळेत सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान बाबत त्यांनी विचारले असता विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मदतीने शाळा कशी सुंदर झाली हे विद्यार्थ्यानी सांगितले. स्वच्छता मॉनिटर बाबत त्यांनी माहिती विचारली विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरचे काम कशाप्रकारे सुरू आहे हे सांगितले. महा वाचन अभियान या उपक्रमाबाबत वाचनाविषयी काय काय सुरू आहे हेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रम विषयी विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थ्यांनी भरभरून उत्तरे दिली.पंतप्रधानांच्या भाषणातील कोणता भाग आवडला हे अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार सांगितले आपल्याला काय बनायचं आहे याविषयी विचारले असता मोठे होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून देशाची सेवा करायची आहे असे विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. शिक्षण घेताना उत्तम विद्यार्थी राहणे हेही एक प्रकारचे देशसेवा आहे असे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. एकूणच शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील आंतरक्रिया कशी आहे हे या संवाद सत्रातून शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आले. त्याबद्दल त्यांनी शाळेतील विद्यार्थी शिक्षक सर्वांचे मनापासून अभिनंदन केले विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. संवाद साधताना उत्तम सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला.

प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे यांनी प्रास्ताविक केले यावेळी जिल्हा मुख्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅडम व श्रीमती गोदावरी राठोड मॅडम उपस्थित होत्या शाळेच्या वतीने शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षिका श्रीमती रंजना काटकर, श्रीमती वैशाली गोंदकर, श्रीमती तेजश्री, श्रीमती रसिका बंदीछोडे, शिक्षक शिवशंकर राठोड शिवाजी वडते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांनी शाळा प्रथम क्रमांक पटकावून नावारूपाला यावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

One thought on “जि.प.शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारेनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *