‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो सोलापूर –

प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन वरळी येथील आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धेचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित होते.
खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी त्यामुळे यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया असे आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू असून या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे यंदाच्या वर्षी ७५ हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सरकार युवक आणि युवतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवक युवतींना विविध प्रशिक्षणे देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीं युवक-युवतीनी मानधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करत प्रशिक्षणार्थीं मानधन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
या स्पर्धांमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १६ संघांनी आजच्या अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले यंदाच्या वर्षी सातारा सिंघम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *