कुंभारी रे नगर परिसरात श्री सेवेमार्फत वृक्ष लागवड…

मेट्रो सोलापूर –

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व रे नगरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजता रे नगर कुंभारी येथील परिसरामध्ये वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे . याचबरोबर दोड्डी ते कुंभारी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वृक्ष लागवड करण्यात येणार आहे,यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, करंजा,चिंच इत्यादी उपयुक्त देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जेसीबीच्या साह्याने खड्डे घेऊन पंधराशे वृक्षांची लागवडासह संगोपनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *