‘मराठा आरक्षण’ शांतता रॅलीमुळे सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर 

 

 

    छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब             आंबेडकर चौक मार्गावरील वाहतूक बंद            

मेट्रो सोलापूर – सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून प्रशासनाने परवानगी दिलेल्या मार्गावरून शांतता रॅली काढणार असून बुधवारी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान मराठा बांधव एकत्रित येऊन शांतता रॅली काढुन सभा घेणार आहेत यासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सकल मराठा बांधव येणार असल्यामुळे शहरातील विविध शाळा,महाविद्यालये व शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र या शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक बुधवार ०७/०८/२०२४ रोजी सुट्टी जाहिर केले आहे तथापी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन आपले कामकाज करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले आहे.

छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस जाणे – येण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे याची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *