६८ लिंगास तैलाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ

यंदा लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा झळकणार

सोलापूर √  900 वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस आज शनिवार दि. 13 जानेवारी रोजी नंदीध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील 68 लिंगास तैलाभिषेक ( यण्णीमज्जन ) करण्यात येणार आहे यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे यंदा खास लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा राहणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        प्राचीन परंपरेनुसार यात्रेच्या काळात धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाच्या वातावरणात होणार आहेत या वर्षी दि. १३ ते १७ जानेवारी २०२४ पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत. श्री सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची व श्री सिध्दरामेश्वरांच्या पालखीची मिरवणुक दि. १३ ते १७ जानेवारी २०२४ या काळात पारंपारिक प्रथेनुसार निघणार आहे. शनिवार दि. १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून पालखी व नंदिध्वजाच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन सोलापूर शहराच्या पंचक्रोशीत पारंपरिक नियोजित मार्गाने सिध्देश्वर मंदिरात जातील. तेथून दुपारी १ वाजता नंदीध्वजांची मिरवणुक निघेल व ६८ लिगांना तैलाभिषेक (यण्णीमंज्जन) करून व प्रदक्षिणा घालून रात्री ८ वाजता हिरेहब्बू मठात परत येणार आहे. 

धार्मिक कार्यक्रम असे असतील

दि. १३ जानेवारीला नंदिध्वजाच्या मिरवणुकीणे धार्मिक कार्यक्रमास सुरूवात होवून सोलापूरातील पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंगास तैलाभिषेक (यण्णीमंज्जन) केले जाईल. दि. १४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता अक्षता समारंभ होईल. दि. १५ जानेवारीला रात्री होम मैदानावर होमप्रदीपन समारंभ होणार आहे. दि. १६ जानेवारीला रात्री ८ वाजता शोभेचे दारुकाम व लेझर शो होईल आणि १७ जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी (नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन) होऊन धार्मिक यात्रेची सांगता होणार आहे.

         सोमवार दि. १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वा कसबा पेठेतील मानकरी हिरेहब्बु मठातून होमप्रदीपन (अग्निप्रवेश) सोहळ्यासाठी नंदीध्वजांची मिरवणुकीस प्रारंभ होईल सोन्या मारूती जवळील पसारे यांच्या घराजवळ श्री सिध्देश्वर देवस्थानच्या पहिल्या नंदीध्वजास सायंकाळी नागफणी बांधली जाते व इतर नंदीध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते. आणि तेथून नंदीध्वज मार्गस्थ होऊन साधारणतः रात्री ९.०० च्या सुमारास होम मैदानावरील होमकुंडाजवळ पोहोचल्यानंतर होम हवनाचा आणि कुंभारकन्येच्या अग्निप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो विशेष म्हणजे या दिवशी नागफणीचा पहिला नंदीध्वन पेलण्याचा मान यावर्षी ही सोमनाथ मेंगाणे यांच्याकडेच आहे.या पत्रकार परिषदेस महादेव चाकोते, भीमाशंकर पटणे, अॕड. मिलिंद थोबडे, शिवकुमार पाटील, विश्वनाथ आळंगे, सिद्रामप्पा बमणी, गंगाधर कुमठेकर, गुरुराज माळगे आदींसह देवस्थान पंच कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

रविवारी होणार अक्षता सोहळा 

दि. १४ जानेवारी २०१४ रोजी श्री सिध्देश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची सुगडी पुजनाने श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील संमत्ती कट्यानजीक विधिवत धार्मिक पध्दतीने व परंपरेनुसार साधारणतः दुपारी १२.३० वाजता अक्षता सोहळा होईल. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील मानकरी श्री हिरेहब्बू यांच्या निवासस्थानातून मिरवणुकीला प्रारंभ होऊन परंपरेनुसार जागोजागी नंदीध्वजाची पारंपारिक पध्दतीने पुजा होऊन दुपारी १२.३० वाजता श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील संमत्ती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न होईल अक्षता सोहळा नंतर पुनश्चः एकदा ६८ लिंगांना प्रदक्षिणा करण्यासाठी नंदीध्वज मार्गस्थ होतील व रात्रौ १२ वाजेपर्यंत नंदीध्वज हिरेहब्बु मठात परत येणार आहेत.

” संस्कारभारती ” ची तीन किलोमीटर रांगोळी
दि. १४ जानेवारी २०२४ रोजी अक्षता सोहळयाच्या दिवशी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर “संस्कारभारती” चे संपूर्ण भारत देशातील ४५० ते ५०० रंगावली कलाकार आपली कला सादर करत रांगोळीच्या पायघडया
(पथरंगावली) घालणार आहेत. उत्तर कसबा हिरेहब्बू मठापासून ते सिध्देश्वर मंदिरातील संमती कट्टा या तीन किलोमीटरच्या मार्गावर रंगावलीची सुरेख पायघडी अंथरण्यात येणार आहे. 

मंगळवारी खास आकर्षक लेसर शोचे आयोजन
मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता होम
मैदानावर शोभेचे दारूकाम आतषबाजी सह खास लेसर शो होणार आहे या लेसर शो मधून श्री सिद्धरामेश्वरांचे जीवन चरित्र, समाज प्रबोधन संदेश तसेच यावर्षी पौराणिक कथा राहणार आहेत. लेसर शोसाठी बेंगलोर येथील नामांकित कंपनीला निमंत्रित करण्यात आले असल्याचे यावेळी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले. 

प्रथमच सायक्लोन, मेरीगो राऊंड, सुनामी, टॉवर विशेष आकर्षण 

यात्रा काळात विविध स्टॉल्स दुकाने व करमणुकीची साधने उपलब्ध राहणार आहेत तसेच करमणुकीसाठी रेंजर पाळणा, टॉवर पाळणा, आकाश पाळणे, ऑक्टोबस ट्विस्टर, मारुती मौत का कुवा, ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, क्रॉस व्हील , सेलंबो , मिनी ड्रॅगन रेल, नावाडी, टोराटोरा तसेच प्रथमच सायक्लोन, मेरीगो राऊंड, सुनामी, टॉवर , रेम्बो इत्यादीचे आकर्षण राहणार आहे.

तीन वर्षानंतर प्रथमच जनावर बाजार भरणार

यात्रा काळात तीन वर्षानंतर प्रथमच यंदा जनावरांचा बाजार भरत आहे. 31 जानेवारी 2024 दरम्यान दर मंगळवारी हा बाजार भरणार आहे त्यासाठी कोणताही अडथळा अथवा अडचण नाही असेही यावेळी अध्यक्ष काडादी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *