१०० व्या नाट्यसंमेलन स्थळाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

सोलापूर √ सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानावर होत असलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गुरूवारी १८ जानेवारी रोजी करण्यात आली.दि. २० ते २८ या दरम्यान होवू घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी नार्थकोट मैदानावर मुख्य मंडप उभारणी करण्यात येत आहे त्या मंडपाची उभारणी होत असताना त्याचा पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी कार्यक्रम कुठे कसे करणे सोईचे होईल आणि येणाऱ्या रसिक श्रोते तसेच कलावंताना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी यासाठी विविध सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर, कोषाध्यक्ष दिलीप कोरके, सहकोषाध्यक्ष सुमित फुलमामडी, आशुतोष नाटकर,गुरूराज यल्लेटी, यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *