लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा – बालरोग तज्ञ डॉ विशाल आंधळकर

कै.नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित आरोग्य तपासणी शिबिर

सोलापूर √ सोशल मिडियाच्या दुनियेत आज सगळ्या कडे मोबाईल आहे जर घरात पालकच तास न तास मोबाईल वर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत असतात त्यामुळे लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा असे प्रतिपादन बालरोग तञ्ज डॉ विशाल आंधळकर यांनी केले .कै नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित बाळे येथील एन के किड्स स्कूल मध्ये विद्यार्थांचे आरोग्य तपासणी शिबिर उदघाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी फार्मासिस्ट योगीराज चाफेकर व संस्थेचे ट्रस्टी विकास कस्तुरे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ म्हणाले की मुलांना टिफिन मध्ये मॅगी बिस्किट कुरकुरे न देता चपाती भाजीचा सकस पौष्टिक आहार द्या म्हणजे मुले आजारी पडणार नाहीत
प्रथमथा कै नागेश करजगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यपिका श्वेता कस्तुरे, दिपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन, कोमल अदलिंगे, पूनम कळसाइत,संगीता हेगडकर यांच्या सह विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *