बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवावे

इंदिरा फेलो रोहिणी धोत्रे यांची मागणी

सोलापूर √ देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घटनांमध्ये वाढ होत आहे आयआयटी बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय युवक काँग्रेस अंतर्गत कार्यरत असलेल्या इंदिरा फेलोशिपच्या उदयोन्मुख फेलो रोहिणी धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अंतर्गत महिलांसाठी इंदिरा फेलोशिप हा विभाग कार्यरत आहे या विभागाअंतर्गत फेलोजची नियुक्ती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आली आहे या अंतर्गतच सोलापुरात रोहिणी धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर रोहिणी धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत आगामी काळातील आपली भूमिका मांडली. देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत महिला सुरक्षा कुठे आहे ? मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला त्याप्रकरणी आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी, भारतीय कुस्ती महासंघाचे पदाधिकारी भाजप खासदाराने महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर संबंधितांवर कारवाई झाली नाही ? ही गंभीर बाब आहे याप्रकरणी कारवाई व्हावी. यापुढे महिला अत्याचाराच्या घटना घडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी रोहिणी धोत्रे यांनी दिला, या पत्रकार परिषदेस प्रगती सस्ते, इंदुमती आटकर, लक्ष्मी धुळे , उषा चौगुले आदी उपस्थित होते.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *