अभियंत्यांनी नावीन्यपूर्ण कामांवर भर द्यावा – डॉ. संजीव कुमार

महापारेषणची दोन दिवसीय स्वयंचलन परिषद

मुंबई √ जागतिक स्तरावर विजक्षेत्रात झपाट्याने मोठे बदल होत आहेत विशेषतः तंत्रज्ञानामुळे विजक्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली आहे त्यामुळे अभियंत्यांनी आपल्या कामांमध्ये सुधारणा करून नावीन्यपूर्ण कामे करण्यांवर भर दिला पाहिजे असे आवाहन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी केले,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वतीने भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय स्वयंचलन (ऑटोमेशन) परिषदेचे उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ.संजीव कुमार बोलत होते. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, कार्यकारी संचालक (संचलन) रोहिदास मस्के, स्वयंचलन, दूरसंचारण, नवकल्पना व विद्युत संरक्षण प्रणालीचे मुख्य अभियंता शशांत जेवळीकर, राज्य भार प्रेषण केंद्राचे मुख्य अभियंता महेश भागवत, मुख्य अभियंता पीयूष शर्मा उपस्थित होते. डॉ. संजीव कुमार पुढे म्हणाले, गेल्या दोन दशकात विजक्षेत्रात वेगाने बदल होत आहेत त्यामुळे अभियंत्यांनीही आपल्या कामांमध्ये योग्य ते बदल करून सृजनशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत या क्षेत्रात जागतिक पातळीवर कोणते बदल होत आहेत, याचा चिकित्सक अभ्यास करून आव्हानांना तोंड दिले पाहिजे.प्रास्ताविकात शशांक जेवळीकर यांनी महापारेषण समोरील आव्हाने, स्वयंचलन (ऑटोमेशन) क्षेत्रातील बदल, सायबर सुरक्षा व नावीन्यपूर्ण कामांविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणच्या स्वयंचलन व विद्युत संरक्षण प्रणालीचे अधीक्षक अभियंता विशाल वाघचौरे, सुधीर ढवळे, प्रशिक्षण विभागाचे अधीक्षक अभियंता संजीवकुमार बद्देला आणि स्वयंचलन, दूरसंचारण, नवकल्पना व विद्युत संरक्षण प्रणाली टीमने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती विभावरी बाविस्कर यांनी मानले.

⬛⬛⬛

विविध विषयांवर प्रशिक्षण घ्या – डॉ.संजीव कुमार

प्रशिक्षण विभागाने यापुढेही मानव संसाधन व अभियंत्यासाठी नवनवीन विषयांवर आधारित प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे प्रशिक्षणामुळे कामांत सकारात्मक बदल होतील आपल्या काही सूचना असतील तर थेट माझ्याशी बोला चांगल्या सूचनांचे स्वागत करून तातडीने अंमलबजावणी केले जाईल असे सांगत डॉ. संजीव कुमार यांनी या दोन दिवसीय परिषदेला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *