निमित्त जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कहाणी एका संघर्षाची …

पोलीस उपनिरीक्षक संगीता हत्ती – खात्यातील जखमी वाघीण संघर्षातून पुन्हा उभी.

सोलापूर ∆ कर्तृत्व व संघर्ष आणि पुनर्जन्म याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संगीता मल्लाप्पा हत्ती (पोलीस निरीक्षक) त्यांचे पूर्वीचे नाव संगीता धोंडप्पा कोप्पा सोलापुरात त्यांचा जन्म, शिक्षण झाले वडील रेल्वेत होते,ते लहानपणीच वारले,त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी लवकर आली.पोलीस भरतीपूर्वी त्या व्हॉलीबॉल खेळायच्या,त्यांना ट्रेकिंगचीसुद्धा आवड आहे, आणि पोलीस भरतीनंतर ऍथलीट बनल्या संगीता मॅडम १९९२ साली कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या आणि २००३ च्या डिपार्टमेंटल डायरेक्ट एमपीएससीच्या परीक्षे मधून पीएसआय झाल्या. त्यांनी सोलापूर शहर,सोलापूर ग्रामीण,सांगली,मुंबई रेल्वे,अँटी करप्शन ब्युरो, एस आय डी, पोलीस ट्रेनिंग सेंटर, पुणे रेल्वे या ठिकाणी सेवा बजावली. सध्या त्या पुणे रेल्वेकडे असून त्यांच्याकडे SDPO सोलापूर रेल्वे पोलीस विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे.त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट खेळाडू,उत्कृष्ट, महिला पोलीस, लढवय्या मुंबईकर, बसवरत्न, नेहरुयुवा, रणरागिणी,सावित्रीची लेक,अशोक कामठे,अशा प्रकारचे जवळपास ६० पेक्षाही जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी महिला विभागात अनेक कुटुंबांचे भांडण,वाद, मतभेद व समस्या सोडवून त्यांच्या संसाराची घडी बसवून दिली.आता कधी कधी लोक त्यांना भेटल्यावर तुमच्यामुळे आमचा मोडणारा संसार जुळून सुखाचा झाल्याचे सांगतात,तेव्हा त्यांचे मन भरून येते आणि त्या समाधानी होतात.अशा कर्तृत्ववान महिलेस दोन हजार सालातील पहिल्या सात वर्षात दोन जबरदस्त धक्के बसले. दुर्दैवाने २०१३ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले,त्यातून सावरत – सावरत त्यांनी दोन्ही मुलांना मोठे केले.दुसऱ्या धक्क्याने तर त्यांना जमीनदोस्तच केले होते,जणू त्यांच्या जिद्दीमुळे त्यांचा पुनर्जन्मच झाला म्हणावा लागेल दि.१९/०२/२००० हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. त्यादिवशी पुण्याहून सोलापूरला येत असताना टेंभूर्णी जवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर – ट्रॉलीने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला,त्या अपघातग्रस्त वाहनातून कशाबशा बाहेर आल्या, परंतु काही कालावधीतच त्यांच्यावर उसाच्या बगॅसची ट्रॉली कोसळली व सर्वांगावर जखमा झाल्या, त्यावेळी त्यांना समोर मृत्युचे तांडव दिसत होते त्यानंतर त्यांना तीन-चार महिने रुग्णालयात ठेवावे लागले.शरीरात काही ठिकाणी रॉड घालावे लागले औषधोपचारासाठी प्रचंड खर्च झाला या भीषण अपघातानंतर त्यांचा पुनर्जन्मच झाला म्हणावा लागेल. तरी पण त्यांनी हिंमत हरली नाही आता या जखमी वाघिणीने पूर्वीप्रमाणेच आपली दिनाचर्या कायम ठेवून ताठमानेने पोलीस सेवा निष्ठेने बजावत आहेत.या साऱ्या संकटाचा,वेदनांचा साधा लवलेशही चालण्या – बोलण्यातून जाणवत नाही.व्यक्तीमत्व एक व रुप अनेक अशा या संगीता मॅडम,सध्या दोन मुले विनायक, विश्वनाथ व सासुची अशी कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर आहे कठोर परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या संगीता मॅडमचा स्वभाव शांत,संयमी व निगर्वी आहे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *