अल्पावधीत काळात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले – डॉ शैलेश पाटील

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने नारीशक्तीचा सन्मान सोहळा संपन्न

फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण

सोलापूर √ अल्पावधीत काळात सोलापुरात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले असल्याचे प्रतिपादन डॉ शैलेश पाटील यांनी केले श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो /रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा फाउंडेशनच्या वतीने हॉटेल सूर्या इंटरनॅशनल येथेआयोजितकरण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सूर्या हॉटेलच्या संचालिका सौ प्रभावती दत्ता आण्णा सुरवसे,शिवशिंपी महिलामंडळ अध्यक्ष स्मिता नाईक, राष्ट्रीय बुद्धीबळ पंच रोहिणी तुम्मा , कसबा गणपती उत्सव समिती अध्यक्ष शशीकांत विराजदार,उद्योगपती समीर लोंढे, श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे आदी मान्यवर उपस्थित होते

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री सिद्धेश्वर महायात्रा काळातील धार्मिक विधी लहान मुलांचे बाराबंदी पोशाख स्पर्धा तसेच महिलांचे पारंपारिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धेत सोलापूर शहरातील सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा निकाल आणि विजेत्या स्पर्धकांची नावे अशी आहे.

⬛⬛⬛
दर्श धनंजय बंडे, सौरभ मल्लिनाथ सोलापुरे, वीर अमोल तांडुरे, विश्वराज विनायक गुडमणी, शिवशंकर विनायक मोकाशी या मुलांबरोबरच प्रीती विजय नवले, रेश्मा संजय दुधनी, सोनाली सागर हिरेहब्बु, सुजाता रघोजी, तेजश्री आशिष शेंडगे या महिलांनी फोटो स्पर्धेत उत्तुंग भरारी घेत विजेते ठरले.
रिल्स् स्पर्धेमध्ये अपेक्षा अमर पाटील, देवेश सचिन जमादार, आणि जय माने यांनी उत्कृष्ट यश मिळवले. महिलांमध्ये सृष्टी बसवराज आहेरवाडी, दिपाली अभिजीत कोष्टी, आणि कांचन बेडगे यांनी यशाला गवसणी घातली.

⬛⬛⬛
सन्मानित महिला
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित केले होते विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामातून ओळख निर्माण केलेल्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला त्यामध्ये नगर अभियंता सारिका अकुलवार, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.संतोषी मुदकण्णा, डॉ. नेहा रोडा, प्रशासकीय क्षेत्रातील प्राचार्य डॉ. मनीषा शिंदे, सामाजिक क्षेत्रातील अक्कनबळग महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजीता चाकोते, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापिका पंचशील विद्यालय महामाया रणधीरे, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटिक्सच्या उपप्राचार्य नीता आळंगी, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमिला चोरगी, फॅशन डिझाइनिंग क्षेत्रातील धनश्री मणुरे, सामाजिक क्षेत्रातील वीरशैव कक्कया महिला मंडळ अध्यक्ष संगीता जोगधनकर, आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता चंदनशिवे यांचा सन्मान झाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार पुष्पा मल्लिनाथ खुणे यांना देण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी तर आभार प्रिया बसवती यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , सचिव विकास कस्तुरे ,खजिनदार सचिन शिवशक्ती, प्रिया बसवंती विजय नवले, गुरुशांत मोकाशीसह आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *