राज्य राखीव बल सोलापूरचे समादेशक विजयकुमार चव्हाण पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने होणार सन्मानित…

 

 

मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या सन – २०२३ महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक ,पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता सन – २०२३ या वर्षाकरीता निर्देशित केलेल्या राज्यातील विविध प्रवर्गामधील सुमारे ८०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहेत.
सोलापूर बल गट क्रमांक १० चे समादेशक मा. विजयकुमार चव्हाण यांना मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे प्रवर्ग दोन मधून पोलीस दलातील केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले असून १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनी
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस बलातील आदर्शणीय असे समादेशक विजयकुमार चव्हाण यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे रश्मि शुक्ला
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *