भटक्या जाती जमातीची प्रगती रोखून देशात फक्त दोनच व्यक्तीना मोदींनी केले आत्मनिर्भर – अॕड.पल्लवी रेणके

 

मेट्रो सोलापूर √ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या समाजाच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन रेणके आयोग लागू करण्यासाठी सविस्तर चर्चा केली व रेणके आयोगाच्या शिफारशी जशाच्या तश्या लागू करण्याचे विनंती केली असता राहुल गांधीजीने रेणके आयोग जसेच्या तसे लागू करून विमुक्त भटक्यांना केंद्रिय स्तरावर विमुक्त भटक्या समाजास न्याय देण्याचे आश्वासन कॉंग्रेस जाहीर नाम्यात आवर्जून समावेश केलेला आहे. त्यामुळे भटक्या समाजाला राष्ट्रीय स्तरावर न्याय मिळणार आहे. केंद्रीय स्तरावर सरकारी नोकरी मध्ये मोठ्या प्रमाणात संधि उपलब्ध होणार आहे.राहुल गांधींनी मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय यांची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे हा क्रांतिकारी विषयी राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका देशातील विमुक्त भटक्यांना व इतर मागासवर्गीयांना न्याय देणारा क्रांतिकारी निर्णय असून काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात याचा समावेश केलेला आहे. इंडिया आघाडीचे सरकार केंद्रास आल्यास जातीनिहाय जनगणना बरोबरच ५० % आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे वंचित व उपेक्षित समाज घटकांना न्याय मिळणार आहे कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मागासवर्गीयाना सामाजिक न्यायाचे प्रतिबिंब असून सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त भटक्या जाती जमातीची लोकसंख्या आहे तरी सर्व भटक्या जाती जमाती इत्यादींना आपल्या उन्नतीसाठी लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आ.प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून दिल्लीत पाठवण्याचे भावनिक आवाहन काँग्रेस व्हीजेएनटी प्रदेश अध्यक्षा अॕड.पल्लवी रेणके यांनी पत्रकार परिषदेत केले . 

काँग्रेस सरकार ने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विमुक्त भटक्यांना आरक्षण दिल्याने हजारो महिला व पुरुष बांधवांना राजकीय पदे भूषवणाची संधि मिळाली. महिलाना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५०% आरक्षण देण्याचे कार्य कॉंग्रेस पक्षानेच केले असून भाजप सरकारने सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून मागासवर्गीयांच्या सरकारी नोकऱ्यातील संधि कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला आहे.

ED, CBI, Income Tax या सरकारी संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना व लोकप्रतींनिधीना ब्लॅकमेलिंग केले जात आहे याची जाणीव सर्व सामान्य जनतेला कळून चुकले आहे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे व प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचे खोटे आश्वासन दिले असून सर्वसामान्य मध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे रेणके यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेस बादल गायकवाड, सुधाकर बडगुजर, युवराज जाधव, भोजराज पवार, भिमराव बंडगर, लक्ष्मण भोसले आदी उपस्थित होते. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *