यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय, जिद्द,चिकाटी आवश्यक – श्री.ष.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी 

 

वळसंग वाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे थाटात शुभारंभ 

मेट्रो सोलापूर √ यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज न बाळगता पुढे जाता आला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे वळसंग वाडाचे सुनील बाबानगरे यांनी वळसंगचे नांव देशपातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे.शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला असं आशीर्वाचन वळसंग वाडा येथील फंटूश वॉटर पार्कच्या शुभारंभ प्रसंगी अफजलपुर मठाचे श्री.ष.ब्र. विश्वाराध्य मळेंहद्र शिवाचार्य महास्वामीजीनीं केले दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोड वरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंग वाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजानांचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वाटर पार्कची निर्मिती केली आहे यावेळी अफजलपुर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते फीत कापून कोनशीला अनावरण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेते रमेश पाटील, शावर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते, युवा उद्योजक यश डोंगरे, वळसंगचे सरपंच जगदीश अंटद, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, आर्किटेक्चर संतोष भंडारे, मल्लिनाथ बाबानगरे, वेदमूर्ती पंडित हिरेमठ, बिराजदार आदींची प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबनगरे आणि सौ अनुपमा बाबानगरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन बाबानगरे परिवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे त्या क्षेत्रात तुम्ही गेला तर हमखास यशस्वी व्हाल सुनील बाबानगरे यांनी वळसंग वाड्यांचे नाव आज देशभर पोचवला आहे उच्चशिक्षित असून देखील हॉटेल व्यवसाय मध्ये आज ते यशस्वी झाले. आता फंटूश वॉटर पार्क च्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स, मल्टीस्लाइडस, बुल राइड्स, बाईक राइड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधांनी हे वाटर पार्क असल्याचे यावेळी सुनील बाबानगरे म्हणाले. यावेळी बाबानगरे परिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छाचा वर्षाव केला याप्रसंगी वळसंग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध प्याटी यांनी तसेच सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *