भावसार व्हिजन सेंट्रलने समाजासमोर ठेवला एक नवा आदर्श – राजकुमार हंचाटे 

भावसार समाजाचा डिजिटल वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न 

मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील भावसार व्हिजन सेंट्रल व भावसार सेवा भाव या संस्थेने निःशुल्क भावसार वधू वर मेळावा घेऊन तसेच मेळावा च्या सुरुवातीलाच डिजिटल सुची देऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे असे गौरवउदगर भावसार समाज सोलापूर चे अध्यक्ष राजकुमार हंचाटे यांनी भावसार वधू वर मेळाव्यात केले 

सुरुवातीला हिंगुलंबिका देवी देवालयचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे, समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे महाराष्ट्र अध्यक्ष श्री गिरिश वायचळ यांनी हिंगलाज मातेची आरती करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि लगेचच डिजिटल सूचीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते लगेच करण्यात आले यावेळी मंचावर मेळावा प्रमुख संजय पंतगे भावसार व्हिजन सेंट्रल अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे, सचिव माधव वळसे , भावसार सेवाभाव चे अमोल हिबारे, स्मितल भावसार उपस्थित होते . 

या वधू वर मेळाव्यास १३२८ पेक्षा जास्त वधू वरांनी नोंदणी केली होती व प्रत्यक्षात ३२६ वधू-वरांसोबत अनेक पालक तसेच विविध राज्यातून आलेले ८०० पेक्षा जास्त भावसार बांधव उपस्थित होते 

भावसार समाजात प्रथमच पेपरलेस म्हणजे पूर्णतः डिजिटल असणारा हा मेळावा होता नोंदणी पासून ते सूची सर्वकाही डिजिटल म्हणजे मोबाईल वरच सूची देण्यात आली 

डिजिटल सूची परेश भावसार व वृषाली मुळे यांनी ही सुंदर डिजिटल सूची तयार केली होती वधू-वरांची ओळख व्हिजन सदस्य सौ रसिका वळसे ,ज्योती क्षीरसागर, नंदा क्षीरसागर, सुषमा डोईजोडे, मेघा पतंगे, ज्योती झिंगाडे, सौ कुसुमकर , किरण रणसुभे यांनी करून दिली 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार व्हिजन चे नॅशनल कमिटी सदस्य आश्विन डोइजोडे, सुहास क्षीरसागर, दीपक आकुडे, राजेश झींगाडे, समाज उपाध्यक्ष साई क्षिरसागर तसेच सदस्य श्रीकांत रंगदाळ ,किरणकुमार मुसळे ,सिद्राम हंचाटे, बालाजी कटारे , प्रभाकर कुसुमकर, प्रभाकर जवळकर, सागर सरवदे , प्रकाश भांबुरे ,सुधीर क्षीरसागर, द्वारका क्षीरसागर , संजय क्षीरसागर , गुजर, सागर पुकाळे रवी वायचळ आदींनी परिश्रम घेतले आभार सचिव माधव वळसे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *