सोलापूरात व माढ्यात कमळ कोमेजले… 

 

   भाजपाला धक्का देत प्रणिती शिंदे विजयीभव…
   माढ्यातून मोहिते पाटलांनी वाजवली तुतारी…

मेट्रो सोलापूर √ सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या जोरदार मुसंडी मारत विजयी झाल्या आहेत तर भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे पराभूत झाले तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले.

 

माकप कडून प्रणिती शिंदे यांचा विजातोत्सव जल्लोषात साजरा…..


महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा आज दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघडीचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते,नेते यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केले व प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *