नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनात सोलार प्रकल्पाची धून…

 

मेट्रो सोलापूर – सोलापूरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन युवा शास्त्रज्ञा अंकिता नगरकर-देगील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,संस्थेचे संचालक योगिनाथ करजगी, सोमनाथ करजगी, नंदिनी करजगी, यशराज करजगी,प्राचार्या रुपाली हजारे,प्री.प्रायमरी इन्चार्ज अनिता अनगोंडा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे युवा शास्त्रज्ञा अंकिता नगरकर यांनी सांगितले की भारताचे अनमोल रत्न डॉ.अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न पाहिले होते की भारत हा शास्त्रज्ञाचा देश बनला पाहिजे त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे तसेच त्यांनी आपल्या अभिप्रायामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या नवनवीन तंत्रज्ञानावर व पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले. तसेच शाळेतील विज्ञान प्रदर्शनासाठी केलेल्या नियोजनाबद्दल शालेय व्यवस्थापन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले,यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांनी विद्यार्थ्यांच्या चिकित्सक दृष्टीस शाबासकी देत कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण असे जल शुद्धीकरण, सोलापूर स्मार्ट सिटीसाठी विजेचे पाच उपाय, चंद्रयान,ग्रीन बिल्डिंग, इलेक्ट्रिक स्केट बोर्ड, थ्रीडी प्रोजेक्टर,रिचार्जेबल टेबल फॅन,पवन चक्की,ऊर्जेची निर्मिती, सोलार प्रकल्प,पाण्याचे नियोजन,मोहोंजोदडो संस्कृती,भारतीय लोकशाही असे विविध प्रयोग सादर केले. तसेच रोबोटिक्स, टॉकिंग ट्री, स्काऊट गाईड, मराठी, हिंदी, सा. शास्त्र, गणित आणि आदिवासींच्या वस्तूंचे दालने सुद्धा या प्रदर्शनामध्ये विशेष आकर्षणाचे स्थान बनले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन काजल कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *