मुंबई ‘ पोलीस शिपाई ‘ भरती करणार तीन हजार कंत्राटी पदे

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता व गरज विचारात घेता, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याच्या कार्यवाहीसाठी लागणारा पदभरतीचा कालावधी” किंवा “बाह्ययंत्रणेद्वारे प्रत्यक्ष मनुष्यबळ उपलब्ध झाल्यापासून ११ महिने या पैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी एकूण ३०००
( पोलीस शिपाई ) मनुष्यबळांची सेवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी बाह्ययंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी एकूण ३००० मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी पत्रान्वये शासनाकडे केलेली होती पुढील भरती प्रक्रिया ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांतर्गत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *