जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविलेलेच खरे यश : डॉ हलकुडे


सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सोलापूर : जीवनाची नीतीमुल्ये सांभाळून मिळविले यश हेच खरे यश असते प्रत्येक मुल हुशार असते, त्याला पालकांनी योग्य संधी व मार्गदर्शन मिळवून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूरातील वालचंद इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग (डब्ल्यूआयटी) कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ शशिकांत हलकुडे यांनी केले.
सहकार महर्षी वि.गु. शिवदारे यांच्या स्मृतीदिन व जयंतीनिमित्त ‘सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतर्फे मंगळवारी (दि.8) सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ॲम्फी थिएटर) हा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सहकारी सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे हे होते. व्यासपीठावर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शशिकांत हलकुडे पुढे म्हणाले की, पाल्याच्या विकासात पालकांच्या संस्काराचा मोलाचा वाटा असतो माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात राजहंसाप्रमाणे चांगले तेच निवडून घेण्याची क्षमता पाल्यांमध्ये निर्माण करा त्यांची निर्णयक्षमता वाढवून वैद्यकीय व अभियांत्रिकी या मळलेल्या वाटांपेक्षा त्यांना त्यांच्या आवडीच्या शाखेत शिक्षणासाठी प्रोत्साहीत करा त्यातूनच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतील. मुलांनीही मेडिकल व इतर अभ्यासक्रमासाठी एखादे वर्ष गॅप घेण्यापेक्षा त्याचवर्षीच प्रवेशासाठी प्रयत्न करणे चांगले असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राजशेखर शिवदारे यांनी संस्था व प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे, ती दूर झाली पाहिजे शासकीय यंत्रणेने प्रवेश प्रक्रियेला गती दिल्यास विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर, बँकेच्या सभासदांच्या ज्या पाल्यांनी दहावी व बारावीत 80 टक्केहून अधिक गुण मिळविले आहेत, त्या 75 गुणवंत पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थीयादी वाचन प्रमोद नारायणकर यांनी केले सूत्रसंचालन शुभदा शिवपुजे यांनी केले पाहुण्यांचा परिचय सीए श्रीधर रिसबूड यांनी करून दिला आभार नरेंद्र गंभिरे यांनी मानले यावेळी बँकेचे संचालक तुकाराम काळे, अशोक लांबतुरे, पशुपती माशाळ, ॲड. मल्लिनाथ पाटील, शिवानंद कोनापुरे, बाळासाहेब आडके, भीमाशंकर म्हेत्रे, इराप्पा सालक्की, प्रकाश हत्ती, सिद्धेश्वर मुनाळे, महेश सिंदगी, ॲड. धानय्या चिवरी, संजय घाळे, राजेश कलशेट्टी, बाळासाहेब भोगडे आदींची उपस्थिती होती.

■■■
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक, श्री स्वामी समर्थ सहकारी सुत गिरणी नि.(वळसंग), दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भांडार, सिद्ध-संग प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी वि.गु. शिवदारे यांच्या स्मृती दिन व जयंतीनिमित्त हा ‘स्मृती समारोह’ सुरु असून यामध्ये बुधवारी (दि.9) फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने कॉलेज ऑफ फार्मसी येथे सकाळी 10 वाजता प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर यांचे ‘सोलापुरातील स्वातंत्र्य चळवळ’ याविषयावर व्यखान होणार आहे. त्यानंतर 11 वाजता विद्यार्थिनींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *