येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण

सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज मोठ्या दिमाखाने डौलत होते दरम्यान मंदिर परिसरात भाविकांकडून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण होत होती.

तिसऱ्या रविवारी पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 9 वाजता अभिषेक व महापूजा करून दिवसभर भक्ताना दर्शनासाठी खुला करण्यात आले सायंकाळी अभिषेक व महापूजा करून रात्री सवाद्य घोडा व नंदीध्वजासह छबिना पालखी मंदिरातून पारंपरिक पद्धतीने लंगर तोडण्यासाठी मार्गस्थ होऊन खडक गल्ली येथे दिवसभर उपवास केलेले जवळपास सोळा लंगरधाऱ्यांचा लंगर तोडण्याचा विधी संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मल्हारायाचा भक्तिसागर लोटला होता यावेळी मंदिरात व गर्भघरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्टी ( सट ) व तीन रविवार असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा यावर्षी भरली होती यात्रा काळात दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम झाले या यात्रेत दर्शनासाठी हजारो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या राज्यातून आले होते. सोलापूर महापालिकेच्या वतीने सिटी बससेवा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले होते मंदीर देवस्थान ट्रस्ट, पुजारी,सोमपा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने यात्रेचे सर्वत्र नेटके नियोजन व चांगली व्यवस्था करण्यात आली होती.

मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 ( बांगरसट ) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मंदिरात सर्व मानकरी, पाटील, पुजारी, तोडकरी, कांबळे, कांबळे, सुरवसे, काळे,लाले,गावडे आदि परिवारासह गावकरी व भाविकांना महाप्रसाद वाटप करून श्रीक्षेत्र बाळे खंडोबा यात्रेची सांगता होणार आहे.

यात्रेतील बहुजनांचा भक्तिसागर

अशी ही मल्हारायाची अनोखी भक्ती…

मल्हारायांनी घेतला मोकळा श्वास यामुळे अनेक भाविकांनी मल्हाररायाचे दर्शन गाभाऱ्यातून घेतले याबद्दल अजिंक्य पुजारी यांच्या या कार्याला आलेल्या यशाबद्दल याचे औचित्य साधून बाळे परिसरातील खंडोबा भक्तांनी त्यांच्या वजना एवढा भंडारा मल्हार रायाच्या पालखीवर उधळण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *