पत्रकारांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती मांडावी – आयुक्त तेली – उगले

सोलापूर महापालिकेतर्फे पत्रकारांचा गौरव

सोलापूर √ पत्रकार हा समाजातला महत्त्वाचा दुवा असून त्यांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे प्रतिपादन सोमपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त सोमपा प्रशासनाच्या वतीने इंद्रभुवन येथील सेंट्रल हॉल येथे मनपा पत्रकारांचा सन्मान आयुक्ता शितल तेली – उगले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त तेली-उगले पुढे म्हणाल्या, पत्रकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आम्हाला अचूक वेगवान व लोकहिताचे निर्णय घेता येतात ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही तिथपर्यंत पत्रकार पोहचतात म्हणूनच पत्रकारांच्या माहितीला व सूचनांना खूप मोठे महत्त्व आहे. काही पत्रकार शहरातील समस्यांबाबत मला वेळोवेळी माहिती देऊन सजग करत असतात त्यांच्या विविध सूचना व बातम्यांची दखल घेऊन त्यावर पालिका प्रशासना मार्फत कार्यवाही करण्यात येते असे ही आयुक्तांनी येथे नमूद केले
यावेळी प्रास्ताविक भाषणात सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी सोलापूरच्या जाज्वल्य पत्रकारितेचा इतिहास मांडला तसेच पत्रकार हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पत्रकारिता करतात. आयुक्ता तेली-उगले यांच्या कार्यकाळात विविध महत्त्वाच्या योजना आणि कामे मार्गी लागली. यापुढेही मनपा प्रशासनास पत्रकारांचे सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी बनसोडे यांनी दिली याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, भगवान परळीकर, एजाजहुसेन मुजावर यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकारांचे योगदान आणि सोलापूरची विकासात्मक पत्रकारिता यावर भाष्य केले.यावेळी उपस्थित पत्रकारांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क व कामगार कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले यावेळी विविध वृत्तपत्र व वाहिन्यांचे पत्रकार व छायाचित्रकार मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *