श्री सिध्दरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी – हत्तुरे

सोलापूर √ शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले मिरवणुक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले सदरचे प्रकरण मंदिर पंचकमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले.

महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा काढून टाकल्यामुळे सर्व लिंगायत समाजामध्ये प्रचंड भावना दुखविल्यामुळे रोष व्यक्त करीत आहेत. मा. प्रशासन व पंचकमिटी यांच्या माध्यमातून श्री सिध्दरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना अशा समाजकटकाना यात्रेत अडथळा आणणे, धार्मिक भावना दुखविणे, समाजामध्ये अशांतता निर्माण करणे, जातीयता देढ निर्माण करणारी घटना असून सोलापूरची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणे. त्वरीत या प्रकरणाचा छडा लावून समाजकंटकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, ही मागणी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच याबाबत त्वरित कारवाई करण्यासाठीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,पालकमंत्री यांच्या सह पोलीस महासंचालकांनाही पाठवण्यात आले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले यावेळी महासचिव सकलेश बाबुळगावकर, बसव भक्त राधाकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *