पुणेप्रमाणे सोलापूरचा कायापालट करुन विकास करु – खा.शरद पवार

सोलापूर विकास मंचच्या कार्याचे शरदचंद्र पवारांनी केले तोंडभरून कौतुक

सोलापूर √ हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या समावेश सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरच्या युवकां मध्ये प्रचंड कौशल्य आणि बुद्धीमत्ता असून, गेल्या तीन दशकांत सोलापूरातील लाखो तरुण नोकरी निमित्ताने कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक झाले आहेत ज्याचा सोलापूरच्या विकासात विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे काही महिन्यांपूर्वी माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या डोणगाव रस्त्यावर आय.टी. पार्कचे भुमिपुजन आपल्या हस्ते पुण्यातील दिग्गज उद्योगजकांच्या उपस्थितीत करण्यात आले त्या विषयी सोलापूर विकास मंचच्या वतीने आभार मानण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून स्वित्झर्लंडच्या दावोस मध्ये आयोजित जागतिक उद्योगजकांच्या मेळाव्यात महाराष्ट्रात अब्जावधी रुपयांचे गुंतवणूक करार झाले पण सोलापूरच्या वाट्याला आणि पदरी एक ही रूपयाची गुंतवणूक झाली नसल्याची बाब सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी शरदचंद्र पवार यांच्या लक्षात आणून दिले. सोलापूरच्या युवकांना सोलापूरात मोठे उद्योग आणि आय.टी. कंपन्यांचे कार्यालय आपल्या पुढाकराने उभे करण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्याकडे करण्यात आली. ह्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात पुण्यातील आय.टी. क्षेत्रात कार्यरत असलेले दिग्गज उद्योगजक अतुल चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपच्या वतीने सोलापूरात ५०० युवकांचे आय.टी. प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून येणार काळात इतर कंपन्यांच्या वतीने देखील प्रचंड प्रमाणात सोलापूरात गुंतवणूक होणार आहे. सोलापूरवर माझे विषेश लक्ष असून आय.टी. पार्क व्यतिरिक्त इतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट थरमॅक्स आणि भारत फॉर्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करुन सोलापूरात त्यांच्या कंपनीचे विविध युनिट्स सुरू करण्या विषयी बोलणी करतो अशी माहिती शरदचंद्र पवार यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिली.पुण्याच्या धर्तीवर सोलापूरचा कायापालट करुन विकास करु, पुण्याच्या विकासात सोलापूरच्या युवकांचे प्रचंड योगदान असुन, येणाऱ्या काळात सोलापूरातील युवकांना सोलापूरात नोकरी आणि व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी आम्ही उपलब्ध देऊ असे आश्वासन त्यांनी मंचच्या सदस्यांना दिले. सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्णपणे सोडविण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने होणारे सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शरदचंद्र पवार यांनी केले. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॕड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, बाळासाहेब मोरे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *