संस्कृतीच्या आचरणाने भारताला विश्र्वगुरुपदी विराजमान करूया – प्राचार्य राम ढाले सर

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्त रामरक्षा स्तोत्र संपन्न

सोलापूर √ आधुनिक काळात मानव सकारात्मक व नकारात्मक वृत्तीतून जीवन जगत आहे मानवाच्या दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास नकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जगत आहे याच वृत्तीतून तिरस्कार, द्वेष यासारख्या गोष्टीमुळे अहंकार निर्माण होऊन आज मानव अधोगतीकडे वाटचाल करत आहे. मानव कल्याण साधायचे असेल तर भारतीयांनी आपली संस्कृती जपली पाहिजे प्राचीन संस्कृतीचे आचरण प्रत्येकाने करून भारताला पाश्चिमात्य व पौर्वात्य देशात विश्वगुरूपदी विराजमान करूया. रामरक्षा पठन केल्याने जीवनातील भय, दुःख, कष्ट नाहीसे होऊन व्यक्तीचे आयुष्य सुखी होते, त्याच्या अंगी नम्रता येते असे श्रीबृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राम ढाले सरांनी प्रतिपादन रामरक्षा स्तोत्र पठन कार्यक्रमात केले

या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सरांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रशालेतील संस्कृत शिक्षक सत्यवर्त आर्य सरांनी रामरक्षा स्तोत्राचे वाचन करून दाखवले या प्रसंगी प्रभू सियारामचंद्र की जय, जय श्रीराम…. जय श्रीरामच्या जयघोषाने प्रशालेत भक्तिमय वातावरण तयार झाले होते.या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन धर्मराज हिपळे सरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *