नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे ‘ कला एकात्मिकरण प्रशिक्षण ’ शिबिर संपन्न

सोलापूर √ सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सी.बी.एस.ई. ( सी ई ओ ) उत्कृष्टता केंद्र पुणे मार्फत एकदिवसीय ‘कला एकात्मिकरण’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक सौ.वृंदा मुलतानी-जोशीसह सौ.रुपाली हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवर प्रशिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका राजेश्वरी शिरकनहळळी वतीने प्रशिक्षकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रशिक्षक सौ.वृंदा मुलतानी-जोशी व सौ.रुपाली हजारे यांनी या शिबिरात नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार आनंददायी शिक्षणासाठी कला एकात्मिकरणाचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कला एकात्मिकरण हा नवीन उपक्रम आहे. प्रशिक्षकार्थी शिक्षकांना प्रभावी अध्यापनासाठी विविध कला विषयांचा दैनंदिन अध्यापनात अवलंब करण्यासाठी विविध कृती द्वारे मार्गदर्शन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती चाटी यांनी तर सूत्रसंचालन तुलशाश्री चितारी व आभार प्रदर्शन पूजा जमादार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *