सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील “त्या” झाडांचे पुनर्रोपणासाठी तातडीने स्थलांतर…

सोमपाने पुनर्रोपण प्रक्रिया येत्या चोवीस तासात करून अथवा करवून घेणे गरजेचे

सोलापूर √ सोलापूर रेल्वे जंक्शनचे नूतनीकरणासाठी धामधुमीत काम सुरू आहे यांच कामासाठी सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील जवळजवळ 7 ते 8 झाडे सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान मुळासकट काढण्यात आली होती.यासंदर्भात माहिती WCAS चे अजित चौहान यांना मिळताच त्यांनी सोलापुरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थासह आज सकाळी सोमपा व रेल प्रबंधक अधिकारी निरजकुमार दोहरे यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये तोडलेली झाडे त्वरित पुनर्रोपण करावीत यासाठी तातडीची आग्रही मागणी करण्यात आलेली होती.
यावेळी सोलापूरचे रेल्वे प्रबंधक अधिकारी निरजकुमार दोहरे यांनी तातडीने दखल घेत सर्व झाडांचे पुनर्रोपण करण्याचे आदेश संबंधित रेल्वे विभागाचे गतिशक्ती प्रमुख अवनिश वर्मा यांना दिले व यापुढे कोणतीही वृक्षतोड होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तोडलेली सर्व झाडे पुनर्रोपण करण्यासाठी हटवली या झाडांची पुनर्रोपण प्रक्रिया होण्याच्या प्रयत्नशीलतेसाठी WCAS चे निसर्गप्रेमी अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, शिवमल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश कल्याणकर, पर्यावरण गतिविधीचे प्रवीण तळे, अनिल जोशी, शैलेश स्वामी हे कार्यरत होते.

सोमपाने पुनर्रोपण प्रक्रिया येत्या चोवीस तासात करून अथवा करवून घेणे गरजेचे आहे

⬛ ⬛ ⬛

सोमपा प्रशासनाने तर या घटनेवर संबंधित रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठविल्याचे सांगितले व संबंधित विभागावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे परंतु कारवाईच्या कागदात वेळ दवडण्यापेक्षा सोमपा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने नूतनीकरणासाठी हटवलेल्या त्या झाडांची पुनर्रोपण प्रक्रिया येत्या चोवीस तासात करून अथवा करवून घेणे गरजेचे आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *