आजच्या तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे – आ.सुभाष देशमुख

लोकमंगल फाउंडेशन आयोजित विभागीय रोजगार मिळावा संपन्न

सोलापूर √ तरुणांनी उद्योजक होण्यासाठी समाजात पुढे येऊन प्रामाणिक काम करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्ह्या, असे प्रतिपादन आ.सुभाष देशमुख यांनी केले.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मिळावा बुधवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था [ I T I ] विजापूर रोड सोलापूर येथे संपन्न झाला
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. देशमुख म्हणाले, आजच्या आधुनिकतेच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तांत्रिक कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी मागणी होत आहे तरुणांनी विविध क्षेत्रामध्ये मागणी असलेल्या कोर्सची माहिती घेऊन ते आत्मसात करावेत,तरुणांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची जोड देत कौशल्यावर आधारित कोर्समध्ये प्राविण्य मिळवावे, नकारात्मकता काढून सकारात्मकवृत्तीने शिक्षण घ्यावे.
यावेळी बोलताना नलावडे म्हणाले की, तरुणांमधील सुप्तगुण, कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने हा उपक्रम सुरु केला असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास हनुमंत नलावडे, ट्रेनिंग कॉर्डिनेटर ऋषिकेश कदम,प्रा. अवधूत जाधवर, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते आदीसह विद्यार्थी, युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

⬛⬛⬛⬛⬛
उपस्थित उद्योजक – २३
एकूण रिक्त पदे – २११७
मुलाखत दिलेले उमेदवार – ७४४
प्राथमिक निवड झालेले उमेदवार – ३१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *