आयपीएस एम. राजकुमार सोलापूरचे नूतन पोलीस कमिशनर

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिकला बदली

सोलापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या आहेत.
सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक नियुक्ती देण्यात आले असून त्यांच्या जागेवर जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे.
2010 बॕचचे आईपीएस अधिकारी एम.राजकुमार यांनी यापूर्वी नागपूर येथे डीसीपी म्हणून कार्यरत होते याच बरोबर काही कालावधी करिता मुंबईचे सायबर क्राईम सेलचे प्रमुख म्हणून ही कार्यभार हाताळलेले आहे नागपूरच्या परिमंडळ क्र. ३ चे पोलीस उपायुक्त पदानंतर त्यांनी यवतमाळ येथे पोलीस अधीक्षकपदी सर्वधिक काळ चार वर्षे कामकाज पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *