प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित – शशिकांत रामपुरे

सोलापूर √ सोलापुरातील भवानीपेठ येथील एस.व्ही.सी.एस. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीचा निरोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे उपस्थित होते, प्रथमता महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून “विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित प्राप्त होते,जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमी काहीतरी माणसाने नवनवीन शिकत राहावे “असे सांगितले.
या कार्यक्रमाला एस.व्ही.सी.एस. डीएड. कॉलेजच्या प्राचार्या लक्ष्मी पाटील उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “विद्यार्थ्यांनी आयुष्यात पैशाला महत्त्व न देता ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल”.असे आपल्या भाषणातून सांगितले. “परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले सरांनी केले
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांनी “अभ्यासाचे स्वप्ने पहा पालकांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करा” असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, प्राध्यापिका सोनल जाधव, प्राध्यापिका रेखा उन्नद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सन 2022-23 इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक मिळवलेले व विविध स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आले या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैशाली पवार व कुमारी आकांक्षा रोडगीकर यांनी केले तर आभार प्राध्यापक सागर कवठेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *