स्वराज्य पक्ष ५०० शाखांची स्थापना करणार – जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव तळेकर

सोलापूर √ आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर व नूतन निवडीचा कार्यक्रम गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी सोलापूर समाज कल्याण केंद्र येथे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालायावेळी उपस्थित स्वराज्य पक्ष राज्य उपाध्यक्ष फत्तेसिंह सावंत सरकार,धाराशिव जिल्हाप्रमुख महेश गवळी, सोलापूर उपशहर प्रमुख परमेश्वर (आबा) सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी एजाज हुंडेकरी प्रदीप घागरे जिल्हा संघटक सोलापूर, प्रशांत हिरगुडे करमाळा तालुका प्रमुख ,अमर रणपिसे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख , ऋषीकेश गिड्डे जिल्हा युवक उपाध्यक्ष , आदींना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले अध्यक्षीय भाषणात पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या सूचना देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा व आगामी पंधरा दिवसात सोलापूर शहर जिल्ह्यात ५०० शाखांचे उद्घाटन करावयाचे आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यात शाखा काढून भेट देऊ असा निर्धार करण्यात आला.यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, युवक जिल्हाप्रमुख पैलवान आबा काळे, उत्तर सोलापूर व्यापारी आघाडी प्रमुख विश्वास चव्हाण, सज्जनराव भोसले , विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख आशुतोष तोडसे, उत्तर सोलापूर तालुका युवती प्रमुख कु.अनुजा पाटील उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माढा, अक्कलकोट आदी भागातील पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन उत्तर सोलापूर तालुका सचिव धर्मराज भोसले यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *