११ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा

सोलापूर √ महात्मा बसवेश्वर वधू-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत सहकार्याने दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय लिंगायत महामंचचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळाव्यास सोलापूर येथील शिवयोगी मठाचे प्रमूख प पू.बसवलिंग महास्वामीजी, प.पू. स्वामीनाथ महास्वामीजी,बसव केंद्राचे प्रमूख सिंधुताई काडादी व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या शुभहस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी आकरा वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार रेवणसिध्द जवळेकर, अखिल भारतीय माळी समाज संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे,सकलेश बाभुळगांवकर,चन्नवीर भद्रेश्वर मठ,आंनद मुस्तारे,प्रशांत कोरे,प्रा.राजाराम पाटील,गणेश चिंचोळे, मल्लिकार्जून मुलगे, शिवानंद गोगाव सर सचिन तुगावे, रेवणसिध्द बिजरगी,राजश्री थळंगे,सचिन शिवशक्ती, नामदेव आण्णा फुलारी,तुकाराम माळी,चंद्रकांत पाटील आदीसह सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत, वाणी, माळी, कुंभार,तेली, गवळी , जंगम, शिलवंत, दिक्षावंत,कोष्टी,पंचम,कोष्टी आदीसह सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल , निलेश पाटील, हे या मेळाव्याचे नियोजन करीत आहेत राज्यातील लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालकांनी दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी आकरा वाजता सोलापूर येथील सिध्देश्वर मंदीराजवळील निर्मलकुमार फडकुले सभागृहात उपस्थित रहाण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर वधू वर सुचक केंद्राचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगाव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *