नागेश करजगी ऑर्किड स्कुलचा वार्षिक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

सोलापूर √ बालचमुंची रेट्रो टू मेट्रो तर विद्यार्थ्यांची एक भारत श्रेष्ठ भारत च्या संकल्पनेवर आधारित “रिदम २०२४” चे आयोजन सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये करण्यात आले होते यावर्षी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस देखील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या स्नेह उपस्थितीत करण्यात आला. दि.४ फेब्रुवारी रोजी शाळेचे प्रेरणास्थान स्व.नागेश करजगी यांच्या जयंतीच्या निमित्ताने रेट्रो टू मेट्रो या संकल्पनेवर रिदम २०२४ चे उदघाटन वालचंद औद्योगिक समूहाचे प्रमुख अरविंद दोशी व दि.५ फेब्रुवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिदम २०२४ च्या दुसऱ्या सत्राचे शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ इरेश स्वामी व मा.आ.महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इन सोलापूर चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, अध्यक्ष’ सायन्स फॉर लाइफ संस्था पुणे संजय साळुंखे, अजित पाटील, राजकुमार पाटील,साई एव्हीएशन प्रमुख विक्रांत चांदवडकर, गायक मोहमंद आयाज,संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी,संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते,व्यवस्थापक अक्षय चिडगूंपी,प्राचार्या रुपाली हजारे,प्रि.प्रायमरी प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, ज्यु. कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास शुभेच्छा देताना अरविंद दोशी म्हणाले जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेली ऑर्किड स्कुल, इथला विद्यार्थी नक्कीच उद्याचे भविष्य आहे.

डॉ इरेश स्वामी यांनी आपल्या मनोगतात शाळेची प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले याचबरोबर मा.आ.महादेव जानकर यांनी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की,दादा माझ्या वडिलांसमान असून कुमार दादांसारख्या व्यक्तिमत्त्वाची फक्त सोलापूर शहरालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यकता आहे दादांना शैक्षणिक व कामगारांच्या प्रश्नात मी नक्कीच दादांच्या पाठीशी कायम उभा असेन अशी ग्वाही दिली.

मी माझ्या विदयार्थ्यांना जगाशी स्पर्धा करण्याचे स्वप्न दाखविले माझ्या ७५ वर्षाच्या काळात मी कामगारांची सेवा केली याचे फलित म्हणून मला आज डॉक्टरेट चा बहुमान मिळाला यापुढे देखील मी माझ्या हातून असेच कार्य करण्यासाठी कठीबद्ध असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा सत्कारमूर्ती डॉ कुमार दादा करजगी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.यावेळी प्री.प्रायमरी विभागाचा अहवाल प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा यांनी सादर केला. शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी १२ वर्षात शाळेची झालेली प्रगती व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता याचा अहवाल सादर केला.गणेश वंदनाने सुरु झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित रघुपति राघव राजाराम, अस्सल महाराष्ट्रीयन लावणी,कोळीगीत, होजागिरी सोबतच तेलगु, राजस्थानी,कन्नड,पंजाबी गीतावर नृत्ये सादर केली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी कृष्णाई कबाडे इ. १० वी हिस शै.वर्ष २०२३-२४ चा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिसिला असादे, अनुजा सुसलादी, तृप्ती चाटी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे विद्यार्थी साहिल शेख, वेद कुलकर्णी, समकित मखाना , प्रतीक्षा गुंड, समृद्धी गायकवाड, चैतन्या भंडारे, अक्षरा घोडके, आरुषी उस्तुरगी, अनिशा बंदगुल, श्रीशा तिकटे, आर्या चंडक, पूर्वा कोचर, अनुश्री कराळे, अनन्या सोनकांबळे, वीर वेर्णेकर, यशराज भोसले, इरफान पठाण, मोहम्मद सय्यद यांनी केले.स्कूल हेड बॉय अनिकेत सुरवसे, हेड गर्ल इशिता कल्याणशेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले रिदम २०२४ ला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला रिदम २०२४ च्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या, सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद लिगाडे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *