एस.व्ही.सी.एस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले सुयश

सोलापूर √ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत एनएमएमएस परीक्षेत सोलापुरातील भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेतील ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
या शिष्यवृत्ती परीक्षेत चि.माने सक्षम अप्पाराव, चि. बनसोडे प्रतीक नागेश, कु.स्वामी नंदिनी मनोजकुमार, चि.शिंगे समर्थ दशरथ, कु.धप्पाधुळे अर्चिता चंद्रशेखर, कु.कमलापुरे वैष्णवी यल्लाप्पा,कु.ऐवळे आस्था सुखदेव,कु. हंद्राळमठ श्रेया दिनेश,चि.जगताप पंकज विक्रम, चि.कांबळे शुभम बालाजी, चि.पारशेट्टी समर्थ सिद्धाराम हे गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री. ष. ब्र. परमपूज्य बालतपस्वी चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी सर, संचालक शशिकांत रामपुरे तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले सर, उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे सर तसेच प्रशालेतील शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *