छत्रपती शिवारायाचा पाळणा सोहळा उत्साहात संपन्न…

पाळणा सोहळ्यास माँसाहेब जिजाऊ, तानाजी मालुसरे यांचे वंशज व वीर माता, पत्नी, मुलींची प्रमुख उपस्थिती

सोलापूर √ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मध्यरात्री
‘आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा…l हे गाणे सर्व महिलांनी गात पाळणा सोहळा उत्साहात पार पडला.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती मोठी अतिष बाजी करत छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात मोठा जल्लोष करण्यात आला.

या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ मा साहेबांच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, सोमपा आयुक्त शितल उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, यांच्यासह वीर पत्नी वर्षा लटके, देवकी हडपद, रेखा नावी, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्‍नाबाई चांदोडे, सुषमा माने यांच्या हस्ते पाळणा उत्सव संपन्न झाला.
या भव्य पाळणा सोहळ्यासाठी महिलावर्ग नऊवारी साडी आणि पारंपारिक वेशभूषा करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.

शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब, वीरांगणा व लोकशाही मधील रणरागिनी, न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावरती रात्री दहा ते अकरा या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रीतम परदेशी, खजिनदार सुशील बंदपट्टे, मनीषा नलावडे, लता ढेरे आदी जणांनी परिश्रम घेतले.


⬛ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ⬛
छत्रपती शिवाजी चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात दिसून येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *