जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ लता अकलूजकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर √ विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ. लता अकलूजकर (पुणे) यांना जाहीर झाला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनी दिली. सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील कर्मलक्ष्मी सभागृहात मंगळवार दि.५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत सावितादेवी शहाजीराव राजेभोसले (जिंतीकर) छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे भोसले यांचे वंशज यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे . डॉ लता अकलूजकर यांनी आजपर्यंत इतिहास विषयावर ५२ ग्रंथ लिहिले असून त्यामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास यासह चीन, जपान आणि युरोपचा इतिहास या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचा ‘मस्तानी एक नवीन दृष्टिकोन’ हा ग्रंथ वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. त्या मोडी व ब्राह्मी लिपी तज्ञ आहेत त्यांचे ‘वराह विष्णूचा तिसरा अवतार’ आणि ‘वीरगळ इतिहासाचे एक साधन’ हे ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत त्यांना इतिहास संशोधनाबद्दल केंब्रिज युनिव्हर्सिटी तर्फे सात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे त्यांचे इतिहासातील अमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांना विद्यार्थी इतिहास परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.यापूर्वी शिलालेख तज्ञ स्व.आनंद कुंभार, इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख, इतिहास ग्रंथ लेखक प्राचार्य आर. डी. गायकवाड यांना परिषदेकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे सोलापूरातील इतिहास प्रेमिनीं या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य सुरेश ढेरे आणि परिषदेचे अध्यक्ष अर्चना गुडशेल्लू यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *