नमो विकास रथाद्वारे मोदी सरकारच्या विविध योजनांचा जागर

भाजपाचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळेंचा उपक्रम

सोलापूर √ नमो विकास रथाच्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा जागर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुका व शहरात करण्यात येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळे यांच्या माध्यमातून ही जनजागृती नेटक्या पद्धतीने केली जात आहे.१० वर्षातील मोदी सरकारच्या कामाची माहिती डिजिटल एलईडी स्क्रीन असलेल्या नमो विकास रथातून देण्यात येतआहे या नमो विकासरथाद्वारे अयोध्या श्रीराम मंदिर, पीएम जनधन योजना, उज्वला योजना, विश्वकर्मा योजना, मेक इन इंडिया, मुद्रा योजना, स्किल इंडिया, उजाला, स्टॅन्ड अप इंडिया, जन औषधी, स्वच्छ भारत मिशन या व इतर अनेक योजनांची माहिती विकासरथातील एलईडी स्क्रीनवर चित्रफितीद्वारे दाखवण्यात आली. दिवसभरात साधारणतः २० गावांमध्ये या नमो विकासरथाद्वारे माहिती पोचवण्यात येत आहे असल्याचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळे यांनी सांगितले. शहर भाजप कार्यालयासमोर दि. 25 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री पटेल यांच्या हस्ते या रथाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावे शहर परिसरात या माध्यमातून विकास योजनांची माहिती पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सोलापूर शहरातील काही भाग, अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर , पंढरपूर तालुका आदी परिसरात या रथाद्वारे विकास कामांचा जागर करण्यात आला आहे.सागर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश मुगळे यांनी औरंगाबाद येथून हा विकास रथ तयार करून आणला आहे डिजिटल स्क्रीन , विविध योजनांचे डिजिटल यासह हायटेक असा रथ तयार केला आहे. साऊंड सिस्टिम खणखणीत असून याद्वारे योजनाची माहिती देण्यात येत आहे. या नमो विकास रथाचे सर्व ग्रामीण भागात लोकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे अनेक ठिकाणी हलग्या लावून जंगी स्वागत करण्यात आले. लोक विविध योजनाची माहिती आवर्जून थांबवून ऐकत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकहिताच्या योजना राबवित असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत, आचारसंहिता सुरू होईपर्यंत हा नमो विकास रथ सोलापूर मतदार संघात जनजागृतीचे काम करणार असल्याची माहिती राजेश मुगळे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *