ऑर्किडचे विद्यार्थी ट्राफिक पोलिसांच्या भूमिकेत…

सोलापूर √ सोलापूर शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड मधील आर एस पी च्या ५४ विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला.या अभियाना अंतर्गत नागेश करजगी ऑर्किड स्कुल दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सरस्वती चौक, सोलापूर येथे ट्राफिक पोलिसांची भूमिका निभावली. यावेळी विद्यार्थ्यांनी सिग्नल व वाहतुकीचे नियम याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी सोलापूर वाहतूक शाखेचे निरीक्षक शिंगाडे साहेब,पोलीस निरीक्षक दराडे साहेब, शिंदे साहेब आदी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगूंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्री. प्रायमारी प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा यांनी अभिनंदन केले.
या आर एस पी च्या सर्व विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेचे विजय पोळ, आर एस पी शिक्षक आनंद लिगाडे, शिक्षिका लतीफा सगरी यांचे मार्गदर्शन लाभले सदर अभियान यशस्वीतेसाठी सोलापूर शहर वाहतूक शाखा तसेच शाळेचे शिक्षक शिवलीला विभूते, तृप्ती चाटी, संदीप बुरकुल यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *