वारांगना, तृतीय पंथीयांसाठी घरकुल योजना राबवावी – क्रांती महिला संघ

रेशन कार्ड आहे पण दुर्दैव्याने धान्य मिळत नाही
सोलापूर √
वारांगना व तृतीयपंथीयांसाठी घरकुल योजना शासनाने राबवावी रेशन कार्ड आहे परंतु दुर्दैवाने धान्य मिळत नाही यासह विविध समस्यांना वारांगनाना सामोरे जावे लागते याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी क्रांती महिला संघाच्या समन्वयक रेणुका जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आंतरराष्ट्रीय वारांगना अधिकार दिनानिमित्ताने क्रांती महिला संघाच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधण्यात आला याप्रसंगी रेणुका जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कार्याचा आढावा मांडला विविध प्रश्न,समस्येसह व्यथा यावेळी मांडल्या.
    क्रांती महिला संघाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून संस्थापिका काशीबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारांगना व तृतीयपंथीयांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाते समुपदेशन करत एचआयव्ही प्रतिबंधात्मक कार्यक्रम घेण्यात येतात वेगवेगळ्या सोयी सुविधा राबविण्यात येतात.कोविडच्या काळात वारांगना व तृतीयपंथीयांसाठी बँक अकाउंट काढून दिले त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले,विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मदत करून यातील काही महीलांना आत्मनिर्भर बनवत रिक्षा व शेंगा चटणीचे प्रशिक्षण देण्यात आले जेणेकरून त्या स्वावलंबी होतील.
       रेशन कार्ड आहे मात्र वर्ष दोन, तीन वर्ष होऊन वारांगनाना काही रेशन दुकानदारांकडून धान्य मिळत नाही त्यांचा अवमान केला जातो जाब विचारला असता तुम्हाला रेशन कार्ड कसे मिळाले असा प्रतिप्रश्न विचारला जातो. शासनाने वारांगना व तृतीय पंथीयाच्या प्रश्न व समस्या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ही यावेळी रेणुका जाधव यांनी केली या पत्रकार परिषदेस अमिना शेख, जया चव्हाण, कल्पना चव्हाण, सविता गायकवाड , संगीता चव्हाण, महानंदा थिटे, प्राची वाकसे, मीनाक्षी रणदिवे, अभिलाषा पारे ,दत्तात्रय कामाठे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *