श्री सिद्धेश्वर महिला वसतिगृहात आदर्शनिय महिला दिन साजरा

सोलापूर √ सोलापुरातील तुळजापूर वेस येथील श्री सिद्धेश्वर महिला वसतिगृहाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बी.टेक.तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी मिळून आदर्शनिय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अक्कनबळग महिला मंडळ अध्यक्षा व भाजपा महिला मोर्चाचे राज्य सचिवा रंजीता चाकोते तर अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे चेअरमन भीमाशंकर पटणे होते प्रियंका हत्ती ,राधा हिरेमठ,पौर्णिमा शिवपुजे ,संगीता लकशेट्टी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
आदर्शनिय अशा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे याच वसतिगृहातील संगीता म्हमाणे, सुवर्णा आवाळे, सोनाली म्हमाणे, वैशाली भुसंगे या चार महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून सहृदय सत्कार करून महिला प्रती महिलांनी केलेली कृतज्ञता दिसून आली,यावेळी मनोरंजनात्मक काही कार्यक्रम यावेळी आयोजिले होते.
सहृदय सोहळ्याला उद्देशून रंजिता चाकोते म्हणाल्या महिला हा समाजाचा केंद्रबिंदू असून महिला आपल्या कुटुंबासोबत इतर क्षेत्रात ही अनेक ठिकाणी अग्रेसर आहेत शैक्षणिक व्यवसाय क्रीडा राजकारण अशा विविध क्षेत्रात महिला ह्या पुढे येताना दिसत आहेत महिला आपली परंपरा संस्कार धर्म आणि देश याचा विचार करून जर आपल्या मुलांवर संस्कार घडवला तर येणारी पिढी ही सक्षम आणि देशभक्त अशी पिढी निर्माण होणार आहे ही ताकद फक्त महिलांमध्येच आहे असे प्रतिपादन यावेळी केले .
महिला वसतिगृहाचे एक पालक म्हणून तसेच वडीलधारी माणूस म्हणून आयुष्यात काम करताना या जन्मी मला खूप आनंद होत असल्याची भावना अध्यक्षस्थानावरून बोलताना वसतिगृहाचे चेअरमन भीमाशंकर पटणे यांनी मनोगतातून व्यक्त केली

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक वसतिगृहाच्या प्रमुख पौर्णिमा शिवपुजे यांनी केले तर आभारप्रदर्शन आदिती चौरेनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.टेक.तृतीय वर्षातील विद्यार्थिनी लक्ष्मी रणदिवे, साक्षी कांबळे, प्रतीक्षा मोलक, आदिती शेटे, प्रतीक्षा भुरटे, मुक्ता घाटोळ, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *