रणजितसिंहांनी माढ्याची उमदेवारी मिळवण्यात ठरले यशस्वी…

सोलापूर √ विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत २०१९ ला भाजपचे रणजीतसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजयमामा शिंदे यांचा पराभव केला होता. २०२४ च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेकजण इच्छूक होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते.माढा लोकसभा मतदारसंघामुळे भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात असलेला माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते मात्र २०१९ च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुंसडी मारली होती. रणजीतसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता मात्र, आता या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे उमेदवारी बाबत तर्क वितर्क सुरू होते पण केलेल्या विकासकामाच्या जोरावर उमेदवारी आपल्याला मिळणार याचा निंबाळकर यांना विश्वास होताच अखेर वरिष्ठ नेत्यांनीही निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अकलूजकरांत नाराजी पसरली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत.माढा – बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट),करमाळा – संजय मामा शिंदे (अपक्ष, अजित पवार गटाला पाठिंबा),सांगोला – शहाजीबापू पाटील (शिवसेना, शिंदे गट),माळशिरस – राम सातपुते (भाजप),माण-खटाव – जयकुमार गोरे (भाजप), फलटण – दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *