जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षी घरटे बनविण्याची कार्यशाळा संपन्न

सोलापूर √ जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून सोलापूर वनविभाग सोलापूर, सोमपा व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर व विहंग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सिद्धेश्वर प्रशाला राष्ट्रीय हरित सेना यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे 17 मार्च रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत चिमणी घरटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला WCAS चे मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ यांनी या कार्यशाळेसाठी उपलब्ध झालेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय व त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली यामध्ये सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रा.निनाद शहा सर, नरेंद्र गायकवाड सर, दिलीप कोंडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यशाळा झाल्यावर उपस्थित पर्यावरण प्रेमींना पक्ष्यांना या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी एकूण १०० जलपात्राचे वाटप देखील या कार्यशाळेत करण्यात आले तसेच या कार्यशाळेत तयार केलेली कृत्रिम घरटी देखील देण्यात आली.


या कार्यशाळेत जवळजवळ १२५ हुन अधिक पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेऊन घरटी तयार केली या कार्यशाळेत ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यशाळेसाठी WCAS चे अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, शुभम बाबानगरे, शिवानी गोटे, महादेव डोंगरे, प्रशांत कांचन, श्रुती माने-गांधी, प्रगती तिवारी, सोम पाटील प्रवीण गावडे, महेश कासट, सोम पाटील, रेवन कोळी, सुरज धाकपाडे, प्रवीण जेऊरे, अजय हिरेमठ, आदीनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *