सोलापुरातील भाजी विक्रेत्याची मुलगी युपीएसीत चमकली

बंजारा समाजातील स्वाती राठोडने यूपीएससी परीक्षेत मिळवले घवघवीत यश 

सोलापूर √ सोलापुरात राहणारी स्वाती मोहन राठोड ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत ४९२ रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी,हुशार व होतकरू असल्याने, कबाड कष्ट करून भाजी विकून, आई वडिलांनी तिला शिकवले, स्वातीने आपल्या घरातील परिस्थिती व आई वडिलांची मेहनत याची जाणीव ठेऊन रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखविले.स्वातीचे नातेवाईक असणारे सोमपा कर्मचारी राजू चव्हाण यांनीही स्वातीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळी यांना दिले आहे.

स्वातीच्या या यशाने समाजातून तसेच सर्व समाजबांधव व मित्रमंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *