मोदींना मत देण्यासाठी सज्ज व्हा – फडणवीस

सोलापूर √ जगात आज विकसित अर्थव्यवस्थेत भारत देश पाचव्या क्रमांकावर आहे पुढील टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास संधी निर्माण होतात विकासाला चालना मिळते देशाचा विकास केवळ मोदीच करू शकतात. तेंव्हा मोदींना मत देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात केले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आ.राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर चार हुतात्मा पुतळा चौक येथे आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, जगातील अनेक देश आर्थिकदृष्ट्या संकटात आलेले असताना हिंदुस्थानातील वाघ नरेंद्र मोदी यांच्या चाणक्य नीतिमुळे अर्थव्यवस्था मजबूत टिकून राहिली. अर्थव्यवस्था सक्षम झाल्याने देशात संधी निर्माण होतात. रोजगार मिळतो नोकरी मिळतात पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लागतात गरीब कल्याणाच्या योजना राबवता येतात. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे तर जनसामान्यांच्या कल्याणासाठी पैसा वापरला जातो त्यासाठी योजना राबविल्या जातात ती अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षम केली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले
सोलापूर व सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना गेल्या 70 वर्षात येथील नेत्यांनी काय केले ? असा सवाल उपस्थित करीत या व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे आमदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सिंचन योजना आणून लोकांना पाणीदार केले.लोकांच्या डोक्यावरील हंडा उतरविला 70 वर्षात विरोधी नेत्यांनी काय केले याचा जाब आता लोकांनी विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार हे कार्यक्षम आहेत माढा मतदारसंघातील खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांनी पाणी, रेल्वे सह मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत त्यांनी कामांचा पाठपुरावा केला अडलेली कामे विरोधकांच्या तावडीतून सोडवली आणि मार्गी लावली.
यावेळी भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते, माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक- निंबाळकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी , शहराध्यक्ष नरेंद्र काळे,आमदार सुभाष देशमुख, जयकुमार गोरे, शहाजी पाटील,आ.समाधान आवताडे, आ. बबनराव शिंदे, आ. संजय शिंदे, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. प्रशांत परिचारक, माजीमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे,शिवसेनेचे मनिष काळजे,रश्मी बागल -कोलते, कल्याणराव काळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, संस्कृती सातपुते,विक्रम देशमुख, डॉ.किरण देशमुख, शहाजी पवार, इंद्रजित पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसचे सरकारच्या काळात मूलभूत सुविधांसाठी केवळ एक लाख रुपये निधीची तरतूद होती तर आता मोदी सरकारने 13 लाख कोटी रुपये यासाठी तरतूद केली. हा पैसा कुठून आणला तर पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचारांना जेरबंद केले तोच पैसा जनसामान्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्चला.
रामभाऊ रडणारा नव्हे तर लढणारा नेता आहे त्यांचे नेतृत्व गरीबीतून संघर्षातून तयार झाले आहेत गरिबाचा हा पोर गरीबाच्या कल्याणासाठी ते झटत आहेत. आज त्यांचा अपमान केला जात आहे रामभाऊंनी पैसा नाही तर लोकांचे प्रेम कमावले. येथील महायुतीतील नेत्यांनी ताकद लावली तर येथील दोन्ही उमेदवार निवडून येतील. त्यासाठी जनतेचे प्रेम हवे. कमळाचे बटन दाबा, शॉक काँग्रेसला लागेल आणि मोदींना मत देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून कोण हवा आहे ? असे म्हणताच रखरखत्या उन्हातही उपस्थित लोकांमधून मोदी.. मोदी.. मोदी.. असा उद्घोष झाला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला साथ द्या,असे आवाहन करीत उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला.

⬛⬜⬛ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लक्षवेधी माढा लोकसभा मतदारसंघातून लढणाऱ्या मोहितेंची पिपानी ? तुतारी चिन्ह असा मिश्किलपणे उद्गार काढले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *