रोटरीने आणला अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण – रोटेरियन स्वाती हेरकल

 

रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

मेट्रो सोलापूर √ अतिशय दुर्धर पोलियो टाईप वनचे भारतातुन समुळ उच्चाटन आणि मुक्त करण्यात संपूर्ण जगात रोटरीची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली असुन जगभरात लाखो रोटेरीयन्स स्वतःचा प्रपंच सांभाळून रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बदल आणण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ३१३२ हा कल्ब आणि ह्या अंतर्गत येणारे सगळे क्लब यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या सामाजिक विकासात अमुलाग्र योगदान दिले असुन रोटरीमुळे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण प्रज्वलित केला आहे असे गौरवोद्गार रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.स्वाती हेरकल यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर ३१३२ हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य निर्मितीच्या आधीपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असुन संपूर्ण भारता सहित विदेशात देखिल ह्या कल्ब वतीने केलेल्या कार्याची दखल घेऊन गौरव करण्यात येतो तथा आपल्या कार्याचे अनुकरण केले जात असल्याची रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे रो.जयेश पटेल यांनी माहिती दिली.

सोलापूरात रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात, रोटरीची खरी ताकद निस्वार्थ भाव, समर्पित वृत्ती आणि सचोटीने काम करणार्‍या सर्व रोटेरीयन्स यांना जात असल्याची भावांना रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या प्रेसिडेंट रो.डॉ. स्वाती चिडगुपकर यांनी व्यक्त केल्या. नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजच्या सर्व सदस्यांनी सोलापूरच्या सामाजिक परिवर्तनात मोलाचे योगदान देण्याचा सल्ला रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या सेक्रेटरी रो.विद्या मनुरे यांनी दिला. नव्या नेतृत्वाला रोटरी क्लब ऑफ सोलापूर नेहमीच प्रोत्साहन देते, रोटरी क्लब ऑफ सोलापूर युज यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम माती घ्यावेत त्याला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचा रोटरी क्लब ऑफ सोलापूर अस्टिटंट गव्हर्नर रो.अतुल चव्हाण यांनी आश्वासन दिले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजच्या माध्यमातून सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचे प्रेसिडेंट रो.कपिल बायस यांनी दिली. सोलापूरांच्या प्रत्येक घटकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आमच्या कल्बच्या वतीने यथोचित प्रयत्न करणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचे सेक्रेटरी रो.विजयराज बाहेती यांनी दिली. सोलापूरातील रामलाल चौकातील हॉटेल साई एक्झिक्युटिव्ह येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर युज ह्या नव्या कल्बचे इन्स्टॉलेशन तथा पदग्रहण सोहळा अतिशय उत्साहात पार पडले ह्यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर क्लब युजचे रो.अमोल पाटील, रो.सत्यप्रकाश शर्मा, रो.अमोल जाधव, रो.विजय जाधव, रो.हिंदुराव गोरे, रो.रमेश वायचळ, रो.किरण मुसळे, रो.सिद्धरुध्द जवळकोटे, इतर रोटरी क्लब मधुन रो.जयश्री चव्हाण, रो.शांता येळंबकर, रो. शिवाजी उपरे, रो.राज मणियार, रो.बी.एस. मुंदडा, रो.धनश्री केळकर, रो.अविनाश मठपती, रो.व्यंकटेश सोमाणी, रो.सलाम शेख, रो.संदीप कुलकर्णी, रो.राकेश उदगिरी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचे रो.विजय जाधव यांनी केले, आभारप्रदर्शन क्लबचे सेक्रेटरी रो.विजयराज बाहेती यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *